सोलापूर : मोहोळ तालुक्यातील कातेवाडी गावामध्ये दिव्यांग नागरिकांना जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आले. या वेळी उपस्थित नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला होता. या आधी दिव्यांगांना कधीच पाच टक्के निधी वाटला गेला नव्हता.

मा.औदुंबर धेडे माजी ग्रामपंचायत सदस्य कातेवाडी यांचे सुपुत्र मा. वैजनाथ धेडे यांनी दिव्यांगांची दखल घेत, मा. गट विकास अधिकारी, मा. तहसीलदार मोहोळ यांना निवेदन दिले होते. दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली, तसेच मागणीचा विचार न झाल्यास उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यांच्या पाठपुराव्याला आज यश आले.

यावेळी दिव्यांग नागरिकांनी त्यांचे कौतुक केले, आम्हाला याआधी कधीच निधी मिळाला नव्हता. वैजनाथ धेडे यांनी संभाषणात सांगितले की, हे उपकार नसून तुमचा हक्क आहे. तुमचा हक्क मिळून देण्यासाठी मी फक्त प्रयत्न करीत आहे. तुमच्या काही अडचणी असल्यास स्पष्टपणे मला सांगा, त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करीन, तुमच्या हक्क मिळवून देईन.
ग्रामपंचायत कातेवाडीमध्ये माझ्या दिव्यांग नागरिकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय झाल्याला, मला तो सहन होणार नाही. तसेच दिव्यांग नागरिकांना सरकारी कामांसाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज भासल्यास, ती तत्काळ देण्यात यावी व त्यांना फेऱ्या मारायला लावू नये, असे ठामपणे त्यांनी सांगितले.

स्वातंत्र दिनाच्या या कार्यक्रमास ग्रामसेविका मा. घाटे मॅडम, सरपंच मा. रंजना शिरसागर, ग्रामपंचायत सदस्य मा. दगडू (बंडू) सुतार, माजी ग्रामपंचायत सदस्य मा. औदुंबर धेडे व अन्याय अत्याचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य मोहोळ तालुका अध्यक्ष मा.वैजनाथ धेडे तसेच कातेवाडी गावचे ग्रामस्थ उपस्थिती होते.