मुंबई : राज्य सरकारचं दुर्लक्ष आणि समन्वयाच्या अभावामुळे गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागला, असा आरोप विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला.

ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. गणपती उत्सवासाठी चाकरमान्यांनी १२ ऑगस्टपर्यंत कोकणात पोहोचावं असा आदेश  राज्य सरकारनं काढल्यामुळे अडीच हजार रुपयांची कोवीड चाचणी करत आणि आर्थिक भुर्दंड सोसत, बहुसंख्य चाकरमानी कोकणात पोहोचले. नंतर, १३ ऑगस्टला टोलमाफी करण्यात आली. या टोलमाफीचा कोणता फायदा कोकणात जाणाऱ्या माणसांना मिळाला, असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला.