मुंबई : कोव्हिड-१९चा उद्रेक आणि त्यामुळे झालेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे अनेक लोक मन रमवण्यासाठी गेमिंगमध्ये रस घेत आहेत. त्यामुळे भारतातील सर्वात मोठ्या स्पोर्ट्स कम्युनिटी प्लॅटफॉर्म रुटरने मे महिन्याच्या सुरुवातीला आपल्या अॅपवर एक क्रांतिकारी गेमिंग आणि ई-स्पोर्ट्स स्ट्रीमिंग सुविधा सुरू केली होती. लॉकडाऊनच्या ४-५ आठवड्यातच तिला अंतर्गत रुपाने विकसित केले गेले. या स्ट्रीमिंग टूल्सद्वारे यूझर्सला या श्रेणीतील सर्वोत्कृष्ट ऑ़डिओ-व्हिडिओ क्वालिटी आणि फीचरसह मोबाइल अॅपसह त्यांच्या पीसीमध्ये कोणताही गेम स्ट्रीम करण्याची सुविधा मिळते.
भारतात यापूर्वीही क्रीडाप्रेमी आणि स्पोर्ट्स इन्फ्युएंसर्स यांचा एक मोठा समूह तयार केल्यानंतर, ई-स्पोर्ट्स मार्केटमध्येही गेमर्सचा एक मोठा समुदाय तयार करणे, हे रुटरचे उद्दिष्ट होते. त्यामुळेच या सेगमेंटमध्ये सुरुवात केल्यानंतर काही वेळातच, या प्लॅटफॉर्ममध्ये देशभरातून ५०,००० पेक्षा जास्त आशादायी गेमिंग स्ट्रीमर्स जोडले गेले. स्ट्रीमिंगची सुरुवात झाल्यानंतर एक महिन्यापेक्षाही कमी वेळेत, १.८ ते २ दशलक्षांपेक्षाही जास्त रुटर अॅप डाऊनलोड केले गेले. यासोबत हा भारतात गेमिंग समुदायासाठी कॅटेगरी लीडर बनत आहे.
रुटरचे संस्थापक पियूष म्हणाले, “ या साथीमुळे आम्हाला आमचा ईस्पोर्ट्स आणि गेमिंग प्लॅन वेळेआधीच सुरु करण्याची सुवर्णसंधी मिळाली. आम्ही प्रसार आणि अनुभवातील उत्कृष्ट फीचर्ससह विक्रमी वेळेत आमची टेक्नोलॉजी लाँच केली. आतापर्यंत आम्ही यशस्वीरित्या स्पोर्ट्समध्ये एक समुदाय तयार करत, हे काम आणखी पुढे नेत गेमिंग क्षेत्रात काहीतरी मोठे बनवण्याचा प्रयत्न आहे. यामुळे रुटरला भारतात सर्वाधिक पसंतीचा कंटेंट प्लॅटफॉर्म बनण्यात मदत मिळाली आहे. हा प्लॅटफॉर्म देशातील १६ ते ३० वर्षे वयोगटातील विविध गेमिंग प्रेक्षक आणि स्पोर्ट्स फॅन्सचे मनोरंजन करत आहे. सध्या आयपीएलची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे भारतात ऑडियो आणि व्हिडिओ सेगमेंटमध्ये एकमेव यूझर-जेनरेटेड कंटेंट प्लॅटफॉर्म असल्यामुळे रुटरला २०२० च्या तिसऱ्या तिमाहीत उत्कृष्ट प्रदर्शन करण्याची आशा आहे.”