महाराष्ट्र सरकारकडून १२ महिन्यांच्या कालावधीत पथदर्शी उपक्रमात पाठबळ आणि मार्गदर्शन मिळणार

मुंबई : मुंबईतील फिनटेक स्टार्टअप कर्झा टेक्नोलॉजीजची महाराष्ट्र स्टार्टअप वीक २०२० अंतर्गत राज्यातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणा-या २४ विजेत्यांमध्ये निवड झाली आहे. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्या उपक्रमाअंतर्गत ही निवड करण्यात आली. विजेत्यांना महाराष्ट्र सरकारकडून १२ महिन्यांच्या कालावधीत पथदर्शी उपक्रमात पाठबळ आणि मार्गदर्शन मिळणार आहे.

सरकारी डेटाबेसच्या स्मार्ट वापराद्वारे फिनटेक सोल्यूशन विकसित करण्याच्या प्रयत्नांतून कर्झा, ग्राहकांना अत्याधुनिक उत्पादने वितरीत करण्यात मदत करीत आहे. के:स्कॅन आणि लिटिगेशन बीआय हे डिजिटल मेहनत घेणारे व्यासपीठ असून ते बँक, कॉर्पोरेट्स आणि सरकारी संस्था यांना तत्काळ परिश्रमपूर्वक अहवाल देण्याकरिता बनवण्यात आल्या आहेत. त्यामुळे फसवणूक कमी होते. अचूक माहिती पुरवण्यासाठी मशीन लर्निंग आणि कृत्रिम बुद्धीमत्ता वापरून ७५० पेक्षा जास्त सार्वजनिक स्रोतांचा डेटा एकत्र करून त्याचे विश्लेषण केले जाते. नियमाक आणि लिटिगेशन फायलींचे विश्लेषण करून, या साधनांद्वारे लाखो व्यवसायांवर समग्र अहवाल मिळवता येऊ शकतात. याद्वारे वित्तीय संस्था, सरकारी संस्था आणि इतर विश्वसनीय असेसमेंट सोल्यूशन्सला मदत केली जाऊ शकते.

भारत जसजसा अधिक डिजिटल समावेशक इकोसिस्टिमच्या दिशेने प्रगती करत आहे, तसतसे फसवणुकीवर नियंत्रण मिळाल्याचे दिसत आहे. अशा प्रकारच्या सेवा आणि मजबूत प्रक्रियेची गरज वाढत आहे. या उपक्रमाद्वारे  समकालीन संस्थात्मक आव्हानांना तोंड देण्याकरिता कर्झाच्या एआय संचलित अत्याधुनिक सोल्युशन्सद्वारे सोयीस्कर परिश्रम करणे, जोखीम कमी करणे आणि तत्काळ प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यात आली.

कर्झा टेक्नोलॉजीचे सह संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार शिरहट्टी म्हणाले, “ उद्योजकांच्या वृद्धीची शक्यता वाढवण्यासाठी हा एक आदर्श प्लॅटफॉर्म असून यासाठी राज्यातील संस्थांकडून मदत आणि सहाय्य मिळते. या यशामुळे कर्झा टेक्नोलॉजीज खूप आनंदीत आहे. तसेच टेक सोल्यूशन्ससाठी महाराष्ट्र राज्याबरोबर काम करण्यास उत्सुक आहे. यामुळे जनता, सरकार आणि वित्तीय संस्थांना फायदा होईल.”