मुंबई (वृत्तसंस्था) : विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या २० तारखेला निवडणूक होणार आहे. या द्विवार्षिक निवडणूकीची अधिसूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जारी केली आहे. त्यानुसार, विधानसभेच्या सदस्यांकडून होणाऱ्या या निवडीसाठी येत्या ९ तारखेपर्यंत विधानमंडळ सचिवालयात उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. १० जूनला अर्जांची छाननी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १३ जूनपर्यंत आहे. निवडणूक लढवली गेली तर २० जूनला सकाळी ९ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होईल.

सदाभाऊ खोत, सुजीतसिंह ठाकूर, प्रवीण दरेकर, सुभाष देसाई, रामराजे नाईक निंबाळकर, संजय दौंड, विनायक मेटे, प्रसाद लाड आणि दिवाकर रावते यांचा कार्यकाळ संपत असल्यानं तसंच रामनिवास सत्यनारायण सिंग यांचं निधन झाल्यानं या दहा रिक्त जागांसाठी विधानसभा सदस्यांकडून दहा सदस्यांची निवड केली जाणार आहे.