नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जलसंवर्धनाचं महत्त्व सांगणाऱ्या शिखर से पुकार या लघुपटाचं केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी प्रकाशन केलं.
जलशक्ती मोहिमेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं हा लघुपट तयार केला असून जलसंवर्धनाबाबत जागरुकता निर्माण करणं आणि जलप्रदूषणाला आळा घालण्याकडे जनतेचं लक्ष वेधण्यासाठी एव्हरेस्ट शिखरावर चढाई करून हा संदेश देणारे भारतीय प्रशासकीय सेवेतले अधिकारी रवींद्र कुमार यांच्यावर आधारित हा लघुपट आहे.
यामध्ये देशातल्या नद्यांचा प्रमुख जलस्रोत असलेल्या हिमालय पर्वताचं महत्त्व देखील विषद केलं आहे.