नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संबंध असल्याचा आरोप केल्याप्रकरणी काँग्रेस नेता राहुल गांधी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्याविरुद्ध संघ कार्यकर्त्यांनं दाखल केलेला अब्रुनुकसानीचा दावा करणारी याचिका फेटाळण्यास आज मुंबईच्या सत्र न्यायालयानं नकार दिला. या दोघांना आता या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रियेला सामोर जावं लागेल.

पत्रकार गौरी लंकेश यांची 2017 मधे बेंगलुरू इथं हत्या करण्यात आली होती.