नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणमधील अण्वस्त्र साठ्याबाबत तपासणी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अणु उर्जा संस्थेचे प्रमुख राफेल ग्रॉसी काल इराणमध्ये दाखल झाले आहेत. इराणकडं त्यांनी घोषित न केलेला बराच अण्वस्त्र साठा असल्याचा या अणु उर्जा संस्थेला संशय आहे.

२०१५ मध्ये झालेल्या अण्वस्त्र बंदी कराराचा इराणनं भंग केल्याचा आरोप करत अमेरिकेनं दोन वर्षांपूर्वीच या करारातून बाहेर पडत इराणवर संयुक्त राष्ट्रांनी निर्बंध घालावेत म्हणून पाठपुरावा सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर इथं आलेले राफेल ग्रॉसी हे आज आणि उद्या इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.