गुन्हे शाखा युनिट-४, पिंपरी चिंचवड कडुन सातारा जिल्हयातील कुख्यात वाळु तस्कर सोमनाथ ऊर्फ सोमाभाई चव्हाण व पुणे ग्रामीण हद्दितील मोक्क्यातील आरोपीस अटक
०५ गावठी पिस्टल व ०४ जियंत काडतुसे जप्त. आजपर्यंत एकुण ४७ गावठी पिस्टल व ६८ जिवंत काडतुसे जप्त
पिंपरी : गुन्हे शाखा युनिट-४, पिंपरी चिंचवड कडून वाकड पोलीस ठाणे येथे गु.र नंबर- २०१/२०२० भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३.(२५) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 3७१)(३) सह १३५ प्रमाणेचा तपास सुरु असताना जुलै २०२० मधे अवैध अग्निशस्त्रांच मध्यप्रदेश य महाराष्ट्रातील मोठे आंतरराज्यिय रकेट उधडकिस आणले होते. सदर प्रकरणात मध्य प्रदेशातील मुख्य तस्करासह महाराष्ट्रातील १५ आरोपींना अटक करुन त्यांचेकडून एकुण १९.८९.५००/- रुपये किमतींचे ४२ पिस्टल/गावठी कट्टे व ६४ जिवंत काडतुसे व सेलेरिओं कार जप्त करण्यात आली होती.
सदर प्रकरणात इतर अनेक आरोपींची नावे निष्पन्न झाली होती. परंतु, दरम्यानचे कालाबधित गुन्हे शाखा युनिट ४ चे २० पैकी ०७ कर्मचारी कोरोना बाधित झाल्याने तपासावर मर्यादा आल्या होत्या, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून गुन्ह्याचा परत तपास सुरु करुन, सदर गुन्ह्यातिल निष्मण्ण आरोपी संतोष चंदु राठोड, यय- २३ वर्ष, रा- प्लॉट नंबर-३१, कडोलकर कॉलनी, लायन्स क्लब जवळ, तळेगाव दाभाडे. पुणे याचा शोध घेतला असता त्याचेविरुद्ध लोणावळा पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. १९६/२०१८ भा.दं वि. कलम ३०२,२०१ प्रमाणे दाखल असून, तो नुकताच सदर गुन्ह्यात येरवडा करागृहातून बाहेर आल्याची माहिती मिळाली.
तेव्हा त्यास दि. १०/०८/२०२० रोजी चिंचवड परिसरातून अटक करुन त्यायेकडून ०१ गावठी पिस्टल व ०२ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तसेच सदर प्रकरणात सातारा-सांगली-कोल्हापुर जिल्ह्यात प्रचंड दहशत असलेला कुख्यात वाळूतस्कर सोमनाथ ऊर्फ सोमाभाई रमेश चव्हाण वय-3० वर्षे रा- कालगाव, ता- कराड, जि- सातारा याचेही नाव निष्पण्ण झाले होते. सदर आरोपी हा उन्नज पोलिस ठाणे मु र क्र. २३२/२०२० भा.द.वि.क.३९९,४०२.३५३.,३३२, आर्म अँक्ट (२५) या गुन्हयात न्यायालयीन कस्टडीत सातारा मध्यवर्ती कारागृह येथे दाखल होता, त्यास दि. १७/०८/२०२० रोजी कारागृहातुन ताब्यात घेण्यात आले. त्यास ताब्यात घेबून त्याचेकडे कसोशिने तपास करुन त्याच्याकडून ०४ गावठी पिस्टल व ०२ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
आरोपी सोमनाथ ऊर्फ सोमाभाई रमेश चव्हाण, वयः३० वर्षे रा- कालगाव, ता. कराड, जि. सातारा हा कुख्यात वाळू तस्कर असून तो सदर परिसरात “शुट ग्रुप” नावाची टोळी व “आई साहेब प्रतिष्ठान” नावाची संघटना चालवतो. त्याची सातारा-सांगली-कोल्हापुर-ठाणे जिल्यात प्रचंड दहशत आहे. तसेच त्याच्या वर गंभीर स्वरुपाचे एकूण १८ गुन्हे दाखल आहेत. सन २०१६ मध्ये निगडी परिसराल कुख्यात गुंड कृष्णा डांगे ऊर्फ केडी भाई याच झालेल्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी आहे. तसेच सन-२०१८ साली भारतिय जनता पक्षाच्या ठाणे जिल्हा उपाध्यक्षावर झालेल्या जिवघेणा हल्ला प्रकरणालील तो मुख्य सुत्रधार आहे. आरोपी नामे संतोष चंदु राठोड, वय २३ वर्ष. रा. प्लॉट नंबर- ३१, कडोलकर कॉलनी, लायन्स क्लबजवळ, तळेगाव दाभाडे, पुणे याचे विरुद्ध लोनावळा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला तो नुकताच सदर गुन्ह्यातुन जामीनावर बाहेर आलेला आहे. सदर गुन्हयाचा तपास श्री अंबरिष देशमुख सहायक पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, युनिट- ४.पिंपरी चिंचवड हे करीत आहेत
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त मा. श्री. संदीप विष्णोई, अपर पोलीस आयुक्त मा. श्री. रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे मा, श्री सुधीर हिरेमठ, सहा.पोलीस आयुक्त मा. श्री. राजाराम पाटील गुन्हे यांचे मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा, युनिट-४ चे परिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन दा, शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक अवरिष देशमुख, पोहवा/ प्रविण दळे, नारायण जाधव, संजय गवारे, धर्मराज आवटे. दादाभाऊ पवार, अदिनाच मिसाळ पोना/ संतोष असवले, तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, मो. गौस नवाफ. वासुदेव मुंडे पोशि/ शावरसिध्द पांदरें, प्रशांत सैद, सुनिल गुहे, तुषार काळ, सुरेश जायभाये, अजिनाथ आवासे, धनाजी शिदे, सुखदेव गावंडे, गोविद चव्हाण व नागेश माळी, राजेद्र शेटे तांत्रिक विश्लेषन विभाग गुन्हे शाखा यांनी केली आहे.
वरील माहिती गुन्हे शाखा युनिट-५ पिंपरी चिंचवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन दा. शिंदे यांनी दिली.