नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यातल्या महाड इथल्या इमारत दुर्घटनेतील मदत आणि बचाव कार्य आता असून, या ढिगार्या तून 3 मृतदेह बाहेर काढण्यात आल्यानं एकूण मृतांची संख्या 17 झाली आहे. अपघात झाल्यानंतर जवळपास 40 तास एनडीआरएफच्या जवानांनी अथक शोध कार्य सुरू ठेवले होते.
आज सकाळी दोन मृतदेह मिळाल्यानं या शोध मोहिमेला पूर्ण विराम दिला जाण्याची शक्यता आहे. या अपघातात मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाख रूपये आणि जखमींना पन्नास हजार रूपये देण्याची घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल महाड इथं केली. दरम्यान, या प्रकरणी पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अपघात झाल्यापासून फरार असलेल्या रझाक शेख आणि जावेत इसाने या बिल्डरचा शोध अद्याप सुरू आहे.