नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर कर्जदारांना कर्ज फेडीसाठी देण्यात आलेल्या सवलतीची मुदत ३१ ऑगस्टनंतर पुढे वाढवण्यास रिझर्व्ह बँकेनं नकार दिला आहे. एक मार्च रोजी रिझर्व बँकेनं कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी व्यावसायिक आणि वैयक्तिक कर्जदाते यांना सहा महिन्यांची सवलत दिली होती.

कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या आर्थिक तणावावर उपाय म्हणून ही सवलत देण्यात आली, पण हा तात्पुरता उपाय होता, यावर कायमस्वरूपी उपाय देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.