शिर्डी : 33 वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मौजे निमगांव कोऱ्हाळे,ता.राहता येथे तयार करण्यात आलेल्या सरपंच रोपवाटिकेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा पालकमंत्री प्रा.राम शिंदे, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी, अहमदनगर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने, नाशिक वनवृत्तचे वनसंरक्षक पी.जे.लोणकर, विभागीय वन अधिकारी आदर्श रेड्डी, उपवनसंरक्षक कीर्ती जमदाडे आदी यावेळी उपस्थित होते.

वन विभागातर्फे या परिसरातील सुमारे 15 हेक्टर क्षेत्रामध्ये गट रोपे लागवड कार्यक्रमाद्वारे जवळपास 37 हजार 500 रोपांची लागवड करण्यात येणार आहे.

गावठाण जमिनीचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण योजनेचा शुभारंभ

गावठाण जमिनीचे ड्रोनद्वारे सर्वेक्षणाचा शुभारंभ राहता तालुक्यातील कोऱ्हाळे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आला.

पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा पालकमंत्री प्रा.राम शिंदे, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, सर्व्हेयर जनरल ऑफ इंडिया लेफटनंट जनरल गिरीशकुमार, जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने, नाशिक विभागाचे भूमी अभिलेख उपसंचालक मिलींद चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.

राज्यातील नगर भूमापन योजना लागू नसलेल्या सर्व गावांच्या गावठाणांमधील जमिनींचे जीआयएस आधारित सर्वेक्षण व भूमापन करण्याची भूमी अभिलेख विभागाची योजना आहे. यासाठी ग्रामीण भागातील गावठाणांच्या सीमा निश्चित करुन घेण्यासह गावातील नदी, ओढे, नाल्यांच्या सीमा तसेच रस्त्यांच्या जागा निश्चित करण्यासाठी भूमी अभिलेख विभागामार्फत ड्रोन कॅमेऱ्याद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

शिर्डी पोलीस स्टेशन इमारतीचे भूमीपूजन

शिर्डी पोलीस स्टेशनसाठी बांधण्यात येणाऱ्या नियोजित इमारत तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या 112 निवासस्थान इमारतीचे भूमीपूजन श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. 1 हजार 763 चौ.मी.जागेमध्ये पोलीस स्टेशन तर 10 हजार 577 चौ.मी. क्षेत्रामध्ये निवासस्थान इमारती बांधण्यात येणार आहेत.

पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा पालकमंत्री प्रा.राम शिंदे, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे, जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.छेरींग दोरजे, जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, श्रीरामपूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ.दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे आदी यावेळी उपस्थित होते.