मुंबई : लोकांना निरोगी राहण्यासाठी सतत प्रेरणा देणा-या फिटर (Fittr) या पुण्यातील फिटनेस स्टार्टअपने फिटनेस स्पर्धेची आणखी एक नवी आवृत्ती आणली आहे. ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज (टीसी) सिरीज ११ असे या स्पर्धेचे नाव आहे. १२ आठवड्यांचे हे ऑनलाइन चॅलेंज असून ते १ सप्टेंबर २०२० पासून याची सुरुवात झाली आहे. ७ सप्टेंबरपर्यंत जगभरातून यासाठी नोंदणी स्वीकारली जात आहे.

टीसी११ च्या विजेत्याला कावासाकी निंजा ६५० किंवा त्याच किंमतीचे अॅपल किट बक्षीस म्हणून मिळेल. यासोबतच, पहिल्या ५० उपविजेत्यांना हिरो सायकल लिमिटेड पुरस्कृत हिरो सायकल मिळेल. ९, १० आणि ११ व्या आवृत्तीतील टॉप १० चॅलेंजर्स फिटरतर्फे निवडले जातील. या ३० स्पर्धकांपैकी ज्याचा/जिचा परिवर्तनाचा प्रवास आणि सातत्य विलक्षण असेल, त्याला महिंद्रा थारचे भव्य बक्षीस दिले जाईल.

या आव्हानात, सहभागी स्पर्धकांना सलग १२ आठवड्यांपर्यंत त्यांच्यामधील परिवर्तन दर्शवणारा व्हिडिओ प्रत्येक आठवड्यात अपलोड करणे गरजेचे आहे. एक स्पर्धक म्हणून स्वत:शीच स्पर्धा करण्याची ही कल्पना असून मागील प्रवासाआधारे त्यांचे मूल्यांकन केले जाईल. स्नायूत वाढ, चरबी कमी होणे आणि भूतकाळातील परिवर्तन आव्हानांमधील सातत्य या गोष्टी विचारात घेतल्या जातील. या सर्व आघाड्यांवर जो अग्रेसर असेल, तो चॅलेंजचा विजेता ठरेल.

फिटरचे संस्थापक आणि सीईओ जितेंद्र चोकसे म्हणतात, “संपूर्ण जग सध्या साथीच्या स्वरुपात मोठ्या आव्हानाला तोंड देत आहे. सध्याच्या नाजूक स्थितीत सकारात्मक, प्रेरणाशील राहणे महत्त्वाचे आहे. आमच्या ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंजद्वारे आम्ही हेच करतो. आम्ही लोकांना आव्हान पूर्ण करण्यासाठी सतत पाठींबा देतो आणि प्रवृत्त करतो. या सगळ्यात आपण एकत्र  आहोत आणि आपले आरोग्य व निरोगीपणासाठी गुंतवणूक करत आहोत, ही सर्वात चांगली बाब आहे.”