नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात, येत्या २१ तारखेपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गांच्या शाळा ऐच्छिक तत्वावर सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भात, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या.
यानुसार, विद्यार्थांना, वह्या पुस्तकं, पेन्सिल, पेन, पाण्याच्या बाटल्या यांची देवाण-घेवाण करता येणार नाही. तसंच शाळेत कोणत्याही कार्यक्रमासाठी किंवा खेळ खेळण्यासाठी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.
शाळेत येण्यासाठी पालकांची लिखित परवानगी असणं आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कमीत कमी ६ फुट अंतर राखणं आणि शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मास्क घालणं बंधनकारक असेल.