नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बालमृत्यू दर कमी करण्यात भारताला उल्लेखनीय यश आलं असून, जागतिक पातळीवर भारताने एक हजार जन्म होण्याच्या तुलनेतील मृत्यू दरानुसार १९९० मधील १२६ वरून २०१९ मध्ये ३४ पर्यंत मृत्यू दर कमी केला आहे. संयुक्त राष्ट्रांची बालनिधी संघटना म्हणजेच युनिसेफने जाहीर केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
भारतातील बालमृत्यू दर ४ पूर्णांक पाच दशांश टक्के झाला आहे. १९९० मध्ये भारतात ३४ लाख बालमृत्यू झाले होते, २०१९ मध्ये हे प्रमाण ८ लाख २४ हजारांवर आले आहे. नवजात अर्भक मृत्यूदर १९९० मधील ८९ वरून २८ वर आला आहे.