नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये नोव्हेल कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यावरुन केंद्र सरकारनं खबरदारीचा उपाय म्हणून देशातल्या सात महत्त्वाच्या विमातळावरची आरोग्यविषयक तपासणी कडक केली आहे.

चीनसह हाँगकाँगकडून येणा-या प्रवाशांची दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरु, हैद्राबाद आणि कोचीन विमानतळावर कसून तपासणी होत आहे. या चाचणीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याचे निर्देश नागरी वाहतूक मंत्रालयानं हवाई वाहतूकविषयक सर्व विभागांना दिले आहेत.

विमानतळ प्राधिकरण आणि विमानसेवा पुरविणा-या कंपन्या यांनी कृतीआराखड्याची त्वरित कार्यवाही करावी, असे आदेशही मंत्रालयानं दिले आहेत.