नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृती प्रित्यर्थ भारतानं दक्षिण आफ्रिकेत सुरु केलेल्या बहुपयोगी आंतरराष्ट्रीय केंद्राचं परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर आणि नायजेरियाचे अध्यक्ष महामदू इसोफू यांनी संयुक्तरित्या काल उद्धाटन केलं

हे आंतरराष्ट्रीय केंद्र भारत आणि नायजेरियामधल्या सदृढ मैत्रीचं प्रतिक आहे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे जारी केलेल्या पत्रकात सांगण्यात आलं. महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त भारतानं आफ्रिकेमधे सुरु केलेलं अशाप्रकारचं पहिलच आंतरराष्ट्रीय केंद्र आहे, असंही या पत्रकात म्हटलं आहे.

या केंद्रात दोन हजार लोकांच्या क्षमतेचं प्रशस्त असं सभागृह, ग्रंथालय आहे.