मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या ‘कोरोनाशी दोन हात’ या संवादातील चौथा भाग प्रसारित होणार आहे. ‘कोरोनासह जगण्याची तयारी’ या विषयावरील ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावर व न्यूज ऑन एअर या ॲपवर शुक्रवार दिनांक 11 व शनिवार दिनांक 12 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत ऐकता येईल. ज्येष्ठ समाजसेवक शांतीलाल मुथ्था यांनी ही मुलाखत घेतली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी कसं राहायचं, वैयक्तिक पातळीवर कशा प्रकारे प्रयत्न करता येतील, शाळा कधी सुरू होतील आणि सुरू झाल्या तर त्यासाठी खबरदारी कशी घ्यावी लागेल, गरीब सामान्य रुग्णांसाठी सरकारकडून काय विशेष राबवल्या या संदर्भात सविस्तर माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘दिलखुलास’ मध्ये दिली आहे.