नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसींच्या ६ कोटीपेक्षा जास्त मात्रा विक्रमी वेळेत लाभार्थ्यांना देऊन भारतानं महत्त्वाचा ठप्पा गाठला आहे. काल २१ लाख ५४ हजारापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या. त्यामुळे अवघ्या ७१ दिवसात ६ कोटी २ लाख ६९ हजारापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. काल देशभरात ६२ हजार ७१४ नवे कोरोनाबाधित आढळले. तर २८ हजारापेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत १ कोटी १३ लाखापेक्षा जास्त लोक या आजारातून बरे झाले आहेत, सध्या देशभरात ४ लाख ८६ हजारापेक्षा जास्त सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९४ पूर्णांक ५९ शतांश टक्के झाला आहे.