नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा-II 2018 आणि संरक्षण मंत्रालयाच्या सेवा निवड मंडळाने घेतलेल्या मुलाखतींच्या आधारावर पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी तयार करताना उमेदवाराच्या वैद्यकीय चाचणीचे निकष लक्षात घेण्यात आलेले नाहीत.

उमेदवाराची जन्म तारीख आणि शैक्षणिक पात्रता यांची पडताळणी लष्कराच्या मुख्यालयात केली जाईल. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in. या संकेतस्थळावर निकालाची माहिती मिळू शकेल. अधिक माहितीसाठी उमेदवार 011-23385271, 011-23381125 आणि 011-23098543 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.