नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज देशभरात हिंदी दिवस अर्थात राजभाषा दिन साजरा होत आहे. १९४९ मध्ये याच दिवशी संविधान सभेनं देवनागरी लिपीतल्या हिंदी भाषेला देशाची अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली.
या राजभाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सरकारी स्तरावर अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हिंदी दिनानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.