6 राज्यांत भारतीय रेल्वेचे 164 पायाभूत सुविधा प्रकल्प कार्यरत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेने, दिनांक 18 सप्टेंबर 2020 पर्यंत, बिहार, झारखंड, मध्यप्रदेश, ओदिशा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या 6 राज्यांत गरीब कल्याण रोजगार अभियानांतर्गत 9,79,557 व्यक्ती प्रति दिवस रोजगार उपलब्ध केला.

केंद्रीय रेल्वेमंत्री आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री.पियुष गोयल याप्रकल्पांच्या प्रगतीचे बारकाईने निरीक्षण करत आहेत आणि या राज्यांतील स्थलांतरित मजुरांना या योजनेअंतर्गत कामाच्या संधी  उपलब्ध करून देत आहेत. या राज्यांत रेल्वेचे 164 पायाभूत प्रकल्प सुरू आहेत. ही कामे

(i)रेल्वे क्राँसिंग जवळच्या रस्त्यांचे बांधकाम आणि देखभाल

(ii)  रेल्वेमार्गातील गाळाने भरलेले जलप्रवाह, खड्डे ,नाले यांचा विकास आणि स्वच्छता

(iii)रेल्वेस्टेशनजवळील  रस्त्यांची  दुरुस्ती आणि देखभाल

(iv) रेल्वेच्या बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि रूंदीकरण/कापणी

(v) रेल्वेच्या हद्दीच्या सीमेवरील जमिनीवर व्रुक्ष लागवड करणे

(vi) सध्या अस्तित्वात असणारे  बंधाऱ्यांची/कापणी/पूल यांचे संरक्षण

18 सप्टेंबर 2020 पर्यंत 12,276 कामगारांना या अभियानांतर्गत काम उपलब्ध झाले असून 2056.97 कोटी रुपये या प्रकल्पांची कामे कार्यान्वित करणाऱ्या कंत्राटदारांना देण्यात आले. (चुकते करण्यात आले.)