नवी दिल्‍ली : विवाहाचे कायदेशीर वय  किती असावे, त्या वयाचा आणि मातृत्व यांच्यामध्ये असलेल्या परस्पर अवलंबित्वाविषयी अधिक  माहिती तपासण्यासाठी एका कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. या तपशिलात- 1. आरोग्य, माता आणि बाळ वैद्यकीयदृष्टीने तंदुरूस्त असणे, गर्भावस्थेमध्ये तसेच बाळ जन्माला आल्यानंतर माता आणि बाळाला मिळणारे पोषण यांचा विचार करण्यात येत आहे. 2. नवजात बाळांचा मृत्यूदर तसेच बाळाला जन्म देताना मातांचे मृत्यू होणा-या घटनांचे प्रमाण, एकूण प्रजनन दर, लिंग गुणोत्तर अशा महत्वाच्या मुद्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. 3. त्याचबरोबर माता-बालक यांच्या आरोग्य आणि पोषणासंबंधी असलेल्या घटकांचा विचार करण्यात येत आहे.

या कृती दलाचा अहवाल अद्याप सरकारला मिळालेला नाही.

अशी माहिती केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री स्मृती झुबिन इराणी यांनी आज एक लेखी उत्तरामध्ये राज्यसभेत दिली.