मुंबई : वन विभागाकडून पांढरकवडा (यवतमाळ) येथील मानवी वस्तीमध्ये वावर वाढलेल्या T-T2C1 या वाघिणीस सुरक्षित पिंजराबंद करण्यात आले आहे. या वाघिणीस गोरेवाड़ा (नागपूर) प्राणी बचाव केंद्रात स्थानांतरित करण्यात येत आहे. ही वाघीण पूर्णतः स्वस्थ व सक्षम आढळल्यानंतर जंगलात सोडण्याचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यवाहीवर स्वतः लक्ष ठेवून होते व वेळोवेळी मार्गदर्शन करत होते. या कार्यवाहीत भाग घेतलेल्या सर्व वन अधिकारी व कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक यांचे मी आभार मानतो व कौतुकही करतो. वाघीण आणि नागरिक या दोघांनाही सुरक्षित ठेवण्यास वन विभागास यश आले आहे असेही वनमंत्री श्री.राठोड म्हणाले.