नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लोकांना घरामध्येच राहून टाळेबंदीच्या नियम पाळण्याचे आवाहन केल्याबद्दल भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करण्याच्या काही वेळ आधी श्रीमती गांधी यांनी एका व्हिडिओ संदेशात कोविड -१९ विरोधी संघर्षात आपल्या पक्षाच्या पाठिंब्याचे आश्वासन दिले आणि खंबीर मनोवृत्तीने देश लवकरच या संकटाच्या विरोधात विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला होता.
दरम्यान काँग्रेसनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आजच्या भाषणावर टीका केली आहे. अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन करण्यासाठी कोणत्याही आर्थिक मदतीची किंवा ठोस उपायांची घोषणा नसलेलं हे पोकळ वक्तृत्त्व होतं, असा आरोप काँग्रेसनं केला आहे.