नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८१ पूर्णांक ५५ शतांश टक्के एवढं झालं आहे. आतापर्यंत देशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५७ लाख ३२ हजार ५१८ झाली आहे. यापैकी ४६ लाख ७४ हजारावर रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले आहेत, गेल्या २४ तासात संसर्गमुक्त झालेल्या ८७ हजारावर रुग्णांचाही यात समावेश आहे.
सध्या देशभरात ९ लाख ६६ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या २४ तासात या संसर्गानं १ हजार १२९ रुग्णांचा मृत्यू झाला, त्यामुळे मृतांची एकूण संख्या ९१ हजार १४९ झाली आहे. या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण आता एक पूर्णांक ५९ शतांश टक्के झालं आहे.
दरम्यान, गेल्या २४ तासात देशात ११ लाख ५६ हजारापेक्षा अधिक नमुन्यांची कोविड तपासणी करण्यात आली. आतापर्यंत ६ कोटी ७४ लाखावर नमुन्यांची कोविड तपासणी करण्यात आल्याचं, भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेनं सांगितलं आहे.