नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फेम इंडिया योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि चंदिगडसाठी ६७० इलेक्ट्रीक बसगाड्या केन्द्र सरकारनं मंजूर केल्या आहेत. मध्य प्रदेश, तामिळनाडू, केरळ,गुजरात आणि पोर्ट ब्लेअरसाठी २४१ चार्जिंग स्टेशन्सनाही मंजूरी दिली आहे.

प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांच्या पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीच्या स्वप्नाशी हे अनुरुप असल्याचं केन्द्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. या इलेक्ट्रीक बसेसपैकी २४० गाड्या महाराष्ट्राच्या वाट्याला येणार आहेत. त्यानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या इंटरसिटी आणि नवी मुंबई महापालिका परिवहनासाठी प्रत्येकी १०० बसेस तसंच मुंबईत बेस्टसाठी ४० बसेस आहेत.