नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंग यांचं आज सकाळी नवी दिल्लीत प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. लष्कराच्या संशोधन आणि संदर्भ रूग्णालयात त्यांना २५ जूनला दाखल केलं होतं. सहा वर्षांपूर्वी घरात पडल्यानंतर मेंदूला झालेल्या दुखापतींनंतर त्यांना अनेक आजारांनी ग्रासलं होतं. तेव्हापासून ते कोमातच होते, अशी माहिती रूग्णालय सूत्रांनी दिली आहे.

भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून पक्षात कार्यरत असलेल्या सिंग यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात संरक्षण, परराष्ट्र, आणि अर्थ अशा महत्त्वाच्या खात्यांची तसंच योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. लोकसभेवर पाच वेळा तर राज्यसभेवर ते सहावेळा निवडून गेले होते.
एका चांगल्या संसदपटूला आणि नेत्याला देश मुकल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे, तर विविध महत्त्वाची पदं यशस्वीपणे सांभाळलेले सिंग हे एक उत्तम प्रशासक होते, असं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. य़शवंतसिंग यांनी आधी एक सैनिक म्हणून तर नंतर सक्रीय राजकारणात विविध मंत्रिपदांद्वारे त्यांनी देशसेवा केल्याची प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे.

संरक्षणमंत्री पदासह विविध पदांची जबाबदारी पार पाडणाऱ्या यशवंत सिंग यांच्या निधनाबद्दल संरक्षणनंत्री राजनाथ सिंग यांनी शोक व्यक्त केला आहे. माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही यशवंत सिंग यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनीही एका ज्येष्ठ नेत्याला देश मुकल्याचं म्हटलं असिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यशवंत सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून, एका उत्तम संसदपटू आणि नेत्याला मुकल्याचं त्यांनी म्हटलं आहे.