नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तरप्रदेशातल्या हाथरस इथं एका मुलीवर झालेला कथित बलात्कार आणि मृत्यूचं प्रकरण गंभीर आहे, मात्र या प्रकरणाचा संबंध लावून, उत्तर प्रदेशात दलितांवर अत्याचार होत आहेत, अशा प्रकराचं राजकारण करू नये असं भारतीय रिपलब्लीकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

या प्रकरणी आपण उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. या प्रकरणासंबंधी योगी आदित्यनाथ यांनी आत्तापर्यंत योग्य कारवाई केली असल्याचंही ते म्हणाले. हाथरस जिल्हा प्रशासनानं बाहेरील व्यक्तींना जिल्ह्यात बंदी केली असल्यानं, आपण पीडीत कुटुंबाच्या भेटीला जाऊ शकलो नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.