नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नाशिक शहरात आजपासून दोन दिवसीय राज्यस्तरीय वकील परिषद होत असून, या परिषदेचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते होणार आहे.
या परिषदेच्या दुस-या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार असून, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती भूषण गवई यांच्या हस्ते नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोव्याचे अध्यक्ष अॅड.अविनाश भिडे यांनी दिली.
या राज्यस्तरीय वकील परिषदेच उद्घाटन जिल्हा न्यायालयाच्या आवारात आज संध्याकाळी सहा वाजता सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती भूषण गवई सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग, महाराष्ट्राचे अॅडव्होकेट जनरल अशुतोष कुंभकोणी आणि गोव्याचे अॅसडव्होकेट जनलर देवीदास पंगम हेही उपस्थितीत राहणार आहे.