नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे उद्या एक दिवसाच्या दौऱ्यासाठी वाराणसीमध्ये जाणार आहेत. वाराणसी हा त्यांचा लोकसभा मतदारसंघ आहे.

एका सार्वजनिक कार्यक्रमात ते ३० प्रकल्प राष्ट्राला समर्पित करणार आहेत. काशी हिंदू विश्वविद्यालयात ४३० खाटा असलेलं सरकारी सुपर स्पेशालिटी रूग्णालय आणि बीएचयूमध्ये ७४ खाटांचं मनोरूग्णालय यांचा यात समावेश आहे.

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्मृती केंद्रही ते राष्ट्राला समर्पित करणार आहेत. तसंच उपाध्याय यांच्या ६३ फुटी पुतळ्याचं अनावरण ते करतील. उपाध्याय यांचा हा देशातील सर्वात भव्य पुतळा आहे. भारतीय रेल्वेच्या महाकाल एक्सप्रेसला ते व्हिडिओद्वारे हिरवा झेंडा दाखवतील. ही रेल्वे वाराणसी, उज्जैन आणि ओंकारेश्वर या तीन ज्योतिर्लिंग स्थानांना जोडेल.

प्रधानमंत्री मोदी श्री जगतगुरु विश्वाराध्य गुरूकुल यांच्या शताब्दी समारोहाच्या सांगता सोहळ्याला उपस्थित राहतील. वीरशैववाद ही शैववादातली एक उपपरंपरा आहे. जगतगुरु रेणुकाचार्य भागवदपद यांनी अगस्त्य ऋषींना दिलेली शिकवण श्री सिद्धांत शिखमणी या पुस्तकाच्या रुपानं आणली आहे.

वीरशैवांसाठी हे सर्वात पवित्र पुस्तक मानलं