नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातील शेतकरी हाच सरकारचा केंद्रबिंदू असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. ते आज जळगाव इथं शेतकरी मेळाव्यात बोलत होते.
शेतक-याला कर्जमुक्तीच्या विळख्यातून सोडवण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही प्रथमोपचार असून, शेतक-यांना वीज, पाणी आणि त्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असं प्रतिपादन ठाकरे यांनी यावेळी दिलं.
शेतक-यांचंच सरकार असल्यामुळे शेतक-यांनी काळजी करु नये.शेती क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोचवण्यासाठी काळजी घेतली पाहिजे, ज्यामुळे कमी खर्चात अधिकाधिक उत्पन्न शेतकरी घेऊ शकतील, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं.