पुणे : शिरोली बुद्रुक येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे उदघाटन अभिनेते खासदार डाॅ.अमोल कोल्हे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. जुन्नर तालुक्यातील कोरोना पेशेंटची संख्या वाढत असताना प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुपांतर ऑक्सीजन बेड सुविधेसह कोवीड सेंटर उभारण्यात आले. अडीज कोटी खर्च करुन हे समाजसेवावृत्तीतून व लोक सहकार्यातून आरोग्य सुविधा उभारण्यात आल्या आहे. या आरोग्य केंद्रात पन्नास खाटांची सुविधा आहे. तसेच पंचवीस ऑक्सिजन बेड आहेत. कोवीडच्या सर्व सुविधायुक्त हे सेंटर आहे.

यावेळी समाजसेवक कै.सावळेराम रखमाजी डबडे यांनी गावासाठी पाच एकर जमिन गावाच्या विकासासाठी मोफत दान केलेली आहे. त्यातील तीन एकर क्षेञात भव्य विद्यालय उभारण्यात आले आहे व दोन एकर क्षेञात प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले. पंचक्रोशीतील नागरिकांना सोयी सुविधा मिळाव्या म्हणून आरोग्य केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. त्यांच्या दानशूरत्वाचे स्मरण व्हावे. त्यांच्या कामाची प्रेरणा समाजाने घेत रहावी.

दोन एकर मोफत जमिन प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी दान केल्यामुळे हे काम उभे राहु शकले आहे. त्यासाठी त्यांचा मुलगा अनिल सावळेराम डबडे यांचा खासदार डाॅ.अमोल कोल्हे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. अशा मोठ्या मनाच्या माणसांची व दानशूर व्यक्तींना समाजाला गरज आहे. अशी भावना डाॅ.कोल्हे यांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी व ग्रामस्थांनी या दानशूरत्वाचे कौतुक केले.

यापुर्वी तीन एकर जमिन ही गावाला शाळेसाठी दान केलेली आहे. दान केलेल्या जागेतील विद्यालयास माझे नाव ही न देण्याचा त्यांचा आग्रह होता. कै.सावळेराम रखमाजी डबडे हे समाजातील एक दानशूर व्यक्तीमत्व म्हणून तालुक्यात सुप्रसिदध आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उभारणीसाठी श्री. विघ्हनर साखर कारखानाचे चेअरमन सत्यशिल शेरकर व ग्रामस्थांनी विशेष प्रयत्न केला आहे.

या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उदघाटन प्रसंगी उदघाटक खासदार डाॅ.अमोल कोल्हे, चेअरमन सत्यशिल शेरकर, सौ.आशाताई बुचके, मोनिकाताई महाबरे, हनुमंत कोळेकर, अँड संजय काळे, शरदचंद्र माळी, गुलाब पारखे, संतोष खैरे, गणेश कवडे, विशाल तांबे, सौ.मीना उर्कीडे, सौ.अस्मिता कवडे, लक्ष्मण शेरकर, प्रदीप थोरवे, उल्हास बोऱ्हाडे, डाॅ.बी.व्ही.राऊत, नितिन थोरवे, गणेश राऊत, जितेंद्र पंडीत, सागर सोनवणे, गणेश उर्कीडे, योगेश हांडे, नितीन पंडित, गणेश डबडे, गणपत बोऱ्हाडे, महेंद्र थोरवे, स्वप्निल लोहकरे, संजय उर्कीडे व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.

या प्राथमिक आरोग्य केंद्राची सुविधा पंचक्रोशितील नागरिकांना उपलब्ध करण्यात आल्या आहे.