पुणे:- सण हे नूतनीकरणाचेही प्रतीक असतात. नवरात्रोत्सव सुरु झालेला असताना महिलांनी नवरात्रीचे रंग शेअर बाजारासोबत साजरे करत, स्वतःची वित्तीय आणि महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे साजरे करण्याचा प्रवास सुरू करण्याची ही योग्य संधी आहे. यानिमित्ताने यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी महिला गुंतवणूकदारांनी कोणती वैशिष्ट्ये अंगीकारणे महत्वाचे आहे याबद्दल मार्गदर्शन करत आहेत एंजल ब्रोकिंगचे सीएमओ श्री. प्रभाकर तिवारी.
१. बाजाराचा व्यासंग: अनेक महिला गुंतवणुकदारांनी एरवी पुरुषांचे वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात यशस्वी व्यापारी म्हणून महत्त्वाचे स्थान कमावले आहे. त्यांच्या यशामागील रहस्य पाहिले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. हे श्रेय जाते बाजाराच्या व्यासंगाला. बाजारातील सतर्कतेसाठी या महिला सातत्याने बाजाराचा अभ्यास करतात, त्यांच्या व्यापारी अनुभवाद्वारे दृष्टीकोन विकसित केला.
बाजारातील सतर्कता म्हणजे एक वैयक्तिक गुंतवणुकदार या नात्याने आर्थिक उद्दिष्टे गाठवण्यासाठी तुमच्याकडे योग्य गुंतवणूक धोरण असावे लागते. नियोजित खर्चापासून निवृत्तीच्या नियोजनापर्यंत, पैसा मिळवण्यापासून मालमत्ता मिळवेपर्यंत, यात एक धोरण असले पाहिजे. तुमचा गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यापूरवी तुम्ही तीन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. त्या म्हणजे- तुमच्या वैयक्तिक आर्थिक ध्येयानुसार, गुंतवणूक धोरण तयार करणे. मग ते अल्पकालीन, मध्य किंवा दीर्घकालीन असो. दुसरे म्हणजे आपली जोखिमीची भूक समजून घेणे आणि आपल्या पसंतीच्या गुंतवणुक शैलीत बदल करण्याची तयारी ठेवणे.
एक गुंतवणूकदार म्हणून तुम्ही नुकतीच ट्रेडिंग सुरू केली असेल तर तुम्हाला बाजाराचे योग्य ज्ञान असणे आवश्यक आहे. यशस्वी महिला गुंतवणुकदार, ज्यांनी बाजारातील सतर्कता दाखवून दिली आहे, त्यांच्याप्रमाणे बाजारातील विविध पैलू समजून घेतले पाहिजेत. एका झटक्यात श्रीमंत होण्याच्या चुकीच्या कल्पनेला भुलू नका. बाजारातील सतर्कतेत आणखी एका गोष्टीचा अंतर्भाव होतो. तो म्हणजे तुम्ही बाजाराचे पूर्ण संशोधन केले पाहिजे, बाजार भांडवलीकरण, कर्ज ते इक्विटी रेशो, उत्पन्न गुणोत्तराचे मूल्य, निव्वळ उत्पन्न, उत्पन्नातील वृद्धी, लाभांश इत्यादी महत्त्वाच्या संकल्पना समजून घेतल्या पाहिजेत.
२. सतत शिकत राहणे: यशस्वी महिला गुंतवणूकदारांनी सततच्या शिकण्यातून एक मार्ग दाखवलेला असतो. म्हणजेच, त्यांनी केवळ दैनंदिन अनुभवातून धडेच घेतले नाही तर व्यापार करताना त्या शिकून मिळालेल्या ज्ञानाचा वापरही करतात. सतत शिकत राहणे हा यशाचा खरा मंत्र आहे. मग तुम्ही गुंतवणूक आधारीत वातावरणात काम करत असाल, किंवा मीडिया कंपनीत असाल किंवा विकासात्मक संस्थांमध्ये असाल, हा मंत्र सर्व ठिकाणी प्रभावी ठरतो. संमिश्रपणे स्टॉक मार्केटचा अभ्यास करत रहा, काही काळातच तुम्हीदेखील यशस्वी गुंतवणुकदारांच्या यादीत सहभागी व्हाल.
यशस्वी महिला गुंतवणुकदारांनी दर्शवल्या प्रमाणे, सातत्याने शिकत राहिल्याने उत्तम गुंतवणूक पोर्टफोलियो तयार करण्यास मदत होते. स्टॉक मार्केटमध्ये वैविध्याचा फायदा मिळतो, हे लक्षात घ्या. इथे तुम्ही स्टॉक्स, कमोडिटीज, फ्युचर्स आणि ऑप्शनल्स तसेच चलनातही गुंतवणूक करू शकता. दररोज शिकवण घेणे म्हणजे जाहिरातींच्या खेळाला किंवा कंपन्यांच्या अवाजवी दाव्यांना बळी न पडणे. यासोबतच तुम्ही मायक्रो इकोनॉमिक इंडिकेटर्सचा सतत पाठपुरावा करणे गरजेचे आहे. याचा बाजारपेठेवर महत्त्वाचा परिणाम होतो. त्यामुळे शेअर बाजारासोबत नवरात्रीचे रंग साजरे करा, शिकत रहा, यशस्वी गुंतवणुकदार होण्यासाठी योग्य मार्गावर नक्की याल.
३. संयम आणि भावनिक चातुर्य: यशस्वी महिला गुंतवणुकदारांमध्ये संयम आणि भावनिक चातुर्य या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. लाभकार आणि स्पर्धात्मक परतावे मिळण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक धोरणासोबतच, कोणत्याही स्थितीत भावनिक गुंतवणूक निर्णय टाळणे महत्त्वाचे आहे.
यशस्वी महिला गुंतवणूकदारांच्या मते, बाजारातील हालचाली आणि कंपनीचे अहवाल यांसारख्या व्यावहारिक साधनांद्वारे व्यापार करणे आवश्यक आहे. बाजारात अचानक काही हालचाल झाल्यास तुमचा संयम आणि भावनिक चातुर्य यांची परीक्षा घेतली जाते. या कसोटीच्या प्रसंगीत, अनेक गुंतवणूकदार वैतागून खरेदी किंवा विक्री करतात. यशस्वी गुंतवणुकदाराचे हे लक्षण नव्हे. ठराविक काळानंतर बाजार पुन्हा पूर्वस्थितीत येतो, हे लक्षात घ्यावे. यशस्वी महिला गुंतवणूकदार म्हणतात, बाजार कोसळतो तेव्हा आपल्या एकूण गुंतवणूक धोरणाशी सुसंगत राहणे, अनुभवी गुंतवणुकदार/विश्लेषकांकडे लक्ष देणे, बाजाराच्या मूलतत्त्वांचे सूक्ष्मपणे निरीक्षण करणे आणि त्यानंतर माहितीपूर्ण निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.