नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कांदा दरवाढीला आळा घालण्यासाठी सरकारनं कांद्याच्या साठवणुकीवर निर्बंध घातले आहेत. आजपासून लागू झालेल्या या निर्बंधानुसार घाऊक व्यापाऱ्यांना २५ मेट्रिक टन, तर किरकोळ व्यापाऱ्यांना केवळ २ टन कांदा साठवता येणार आहे. हे निर्बंध यावर्षीच्या ३१ डिसेंबरपर्यंत लागू राहतील.

याआधी सरकारनं १४ सप्टेंबरला कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. मात्र, अलिकडेच झालेल्या परतिच्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश इथल्या खरीपाच्या कांदा पिकावर विपरित परिणाम झाला आहे.