नवी दिल्ली : केंद्रीय माहिती आयोगाने उद्या 9 ऑगस्ट 2019 रोजी नवी दिल्ली येथे मनुष्यबळ विकास आणि माहितीचा अधिकार कायदा 2005 विषयी एका परिषदेचे आयोजन केले आहे.शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित मनुष्यबळ विकासातील प्रशासनात सुधारणा आणि पारदर्शकता आणि उत्तरदायित्वात सुधारणा करण्याच्या उपाययोजनांवर चर्चा करण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व विद्यमान आणि माजी मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त, केंद्रीय माहिती आयुक्त आणि राज्यांचे माहिती आयोगाचे आयुक्त यांच्याबरोबरच प्रथम अपिलीय प्राधिकरण आणि केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकारी यांना या परिषदेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. काही नामांकित स्वयंसेवी संस्थांना देखील यात सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले आहे. काही तज्ञ, व्यावसायिक आणि या क्षेत्रात संशोधन करणाऱ्यांना काही प्रकरणांच्या माहितीसह त्यांच्या अभ्यासाचे सादरीकरण करण्यासाठी देखील निमंत्रित करण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्रात माहितीच्या अधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीच्या महत्त्वाच्या पैलूंबाबत सादरीकरणामध्ये भर दिला जाणार आहे.