नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बीड जिल्ह्यातल्या आष्टी इथे कोरोना विषाणुचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण आढळला, अशी रुग्णाचे नाव आणि फोटोसह खोटी बातमी व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून पसरवणाऱ्या व्यक्तीविरोधात आष्टी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी.एम. सुर्यवंशी यांनी ही माहिती दिली. या बाबत व्हॉट्सअप स्टेटसमध्ये ज्या व्यक्तीचे नाव आणि फोटो वापरला होता त्याने पोलीसांकडे तक्रार केली होती. त्याआधारे पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढचा तपास सुरु आहे.