मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक शहरात कोरोना बळींची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून आज दिवसभरात नाशिक शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मिळून २ रुग्णांचा मृत्यू झा नाशिक जिल्ह्यात कोरोना मुळे आतापर्यंत १ हजार ७०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात २०० रुग्ण बरे झाले आहेत. तर नव्याने १५३ रुग्ण आढळले आहेत.

नांदेड जिल्ह्यात आज नव्यानं  ३५ कोरोनाविषाणू बाधीत रूग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यात आता बाधीतांची एकूण संख्या १९ हजार ४४३ झाली आहे. आज ४ रुग्णांचाला. मृत्यू झाल्यानं आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ५२९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. बरे झालेल्या ४८ रूग्णांना आज घरी जाण्यासाठी सुटी देण्यात आली. आजपर्यंत एकूण १८ हजार ३४५ रुग्ण बरे झाले आहेत. आज एकुण  ४०१ रूग्ण विविध कोविड रूग्णालयात उपचार घेत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात आज १० जणांनी करोनावर यशस्वी मात केली. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या आठ हजार ८४ झाली आहे. जिल्ह्यातल्या करोना रुग्णांची संख्या आता कमी होत आहे. आज रत्नागिरीत केवळ ९ करोनाबाधित रुग्ण आढळले.

औरंगाबाद जिल्ह्यातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. काल दिवसभरात ६४ नवे रुग्ण आढळले, तर एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. औरंगाबाद जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४१ हजार ७९ झाली आहे. तर काल ८१ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.