पुणे :- पुणे विभागातील 4 लाख 83 हजार 137 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 13 हजार 775 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 16 हजार 160 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 478 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.82 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.04 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 28 हजार 957 रुग्णांपैकी 3 लाख 11 हजार रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 9 हजार 943 आहेत. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.44 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.54 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 155 रुग्णांपैकी 43 हजार 874 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 660 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 621 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 42 हजार 223 रुग्णांपैकी 38 हजार 577 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 132 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 514 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 45 हजार 860 रुग्णांपैकी 43 हजार 461 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 729 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 670 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 580 रुग्णांपैकी 46 हजार 225 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 696 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 659 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 823 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 450, सातारा जिल्ह्यात 177, सोलापूर जिल्ह्यात 111, सांगली जिल्ह्यात 56 तर कोल्हापूर जिल्ह्यात 29 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 1 हजार 18 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 720 ,सातारा जिल्हयामध्ये 32, सोलापूर जिल्हयामध्ये 113, सांगली जिल्हयामध्ये 107 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 46 अशा रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 25 लाख 34 हजार 865 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 13 हजार 775 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 10 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )