पिंपरी : डोळ्याला दिसत नसणाऱ्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाची रुग्णसंख्या कमी होताना दिसत असली तरी, दिवाळीनंतर रुग्णसंख्या वाढू शकते. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील नागरिकांनी दिवाळीचा आनंद संयमाने लुटावा. उद्धवसाहेबांनी नागरिकांसाठी राबविलेली ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत सुचविलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून, नागरिकांनी कोरोनापासून दूर रहावे व कमी प्रमाणात फटाके वाजवून प्रदूषण रोखावे. शहरवासियांनी कोरोनाचा अंधकाररुपी राक्षस संपविण्यासाठी जास्तीत जास्त दीप प्रज्वलन करून, शहर प्रकाशप्रमाणे तेजोमय करावे, असे प्रतिपादन कामगार नेते इरफानभाई सय्यद यांनी केले.

साद सोशल फांडेशनच्यावतीने गुरुवारी पिंपरी चिंचवड शहरातील अंध बांधवांच्या कुटुंबीयांसाठी आकुर्डी येथील खंडोबा सांस्कृतिक भवनात “दिवाळी फराळ वाटप” या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या अनुषंगाने सामाजिक सुरक्षिततेचे पालन करून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी इरफान सय्यद बोलत होते. यावेळी जवळपास शंभर अंध बांधव व त्यांच्या कुटुंबियांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. अंध बांधवांच्या दिवाळीत प्रकाशवाटा पेरण्यासाठी आणि त्यांच्या उत्साहात अधिक भर घालण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला होता.

निलेश मुटके म्हणाले, साद सोशल फांडेशनच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून अंध बांधवांसाठी दिवाळी फराळ वाटपाचे आयोजन करण्यात येते. कोरोनाच्या काळात देखील त्यांनी अंध बांधवांप्रती आपले मदतकार्य सुरु ठेवले आहे. समाजातील अंध बांधव व त्यांचे कुटुंबियांना आधार देण्याचा छोटासा प्रयत्न होताना दिसतो. या माध्यमातून दिव्यांग बांधवामध्ये समाजात वावरण्याचा आत्मविश्वास निर्माण होत आहे. साद सोशल फांडेशनने नेहमीच आपला ‘एक हात मदतीचा’ समाजापुढे केला आहे. पंढरीची वारी असो की कोरोना काळातील मौल्यवान मदत असो, त्यांची माणुसकी कोठेही कमी होताना दिसत नाही. संस्थेने समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

अनिल कातळे म्हणाले की, छत्रपतींनी हिंदवी स्वराज्य निर्मितीसाठी स्वराज्याचे तोरण हाती घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. रयत सुखी केली. त्याचा वसा घेऊन इरफानभाईंनी कार्यकर्ते घडविले. संघटना वाढविली. वादळात दिवा जसा तेवत राहतो तसाच समाजकार्याचा वसा त्यांनी हाती घेतला. अंध बांधवाना मदतीसारखे उपक्रम राबवण्याचे काम इरफानभाई व त्यांचे सहकारी करीत आहेत. त्यांच्या कार्याची व्याप्ती अशीच वाढत रहावी.

यावेळी शिवसेना खेड-भोसरी विधानसभा सहसंपर्क प्रमुख इरफानभाई सय्यद, युवा नेते किसन बावकर, शिवसेनेचे निलेश मुटके, साद सोशल फौंडेशनचे उपाध्यक्ष डॉ. महेश शेटे, जनरल सेक्रेटरी प्रविण जाधव, कार्याध्यक्ष परेश मोरे, संघटक राहुल कोल्हटकर, उज्वला गर्जे, पांडुरंग कदम, सर्जेराव कचरे, नागेश व्हनवटे, उद्योजक भीमसेन अगरवाल, दस्तगीर मनियार, जावेद आरकटे, विश्वास टेमगिरे, डॉ. प्रताप सोमवंशी, प्रमोद शेलार, राजेश पंगल, हाजी लालूभाई, निलेश मोरे, संदीप मधुरे, रवी घोडेकर, श्याम सुळके, कैलास मोरे रोशन मोरे, चेतन चिंचवडे, अनिल दळवी, प्रभाकर गुरव, अतिष बारणे, पिंपरी चिंचवड स्वीट असो. चे निरंजन अग्रवाल, प्रितेश शिंदे, अरूण जोगदंड, चंदन वाघमारे, समर्थ नायकवडे, बबन काळे, आबा मांढरे, श्रीकांत सुतार, अनिल खपके, समीर गाडेकर, प्रशांत विटकेल उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड माथाडी मंडळावर कामगार नेते इरफानभाई सय्यद, प्रवीण जाधव व पुणे माथाडी मंडळावर परेश मोरे यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फाऊंडेशनचे संघटक भाऊसाहेब कोकाटे तर आभार सर्जेराव कचरे यांनी मानले.