मुंबई (वृत्तसंस्था) :हुतात्मा स्मृती दिनानिमित्त मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज हुतात्मा चौक इथं हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीला पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली.
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी मराठी जनतेने सर्वस्व पणाला लावून लढा दिला.
या लढ्यात १०७ हुतात्म्यांनी प्राणार्पण केलं. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी २१ नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन म्हणून पाळला जातो.
यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मत्स्य व्यवसाय मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, आदी उपस्थित होते.