मुंबई (वृत्तसंस्था) :भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनी राज्यासह देशाच्या कोनाकोपऱ्यातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येतात.

कोरोनाचे भय कायम असल्यानं यंदा चैत्यभूमीवर शासकीय मानवंदनेचं थेट प्रक्षेपण होणार असून महामानवाला घरबसल्या अभिवादन करता येणार आहे.

या कार्यक्रमाचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण होईल. या दिवशी चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे.

महापरिनिर्वाण दिना निमित्तानं चैत्यभूमी स्मारक इथं करण्यात येत असलेल्या तयारीची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त  संजीव जयस्वाल यांनी काल पाहणी केली.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तसंच कोरोनाची दुसरी लाट येण्याची संभाव्यता लक्षात घेऊन यंदा राज्य शासनासह महानगरपालिका प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.