मुंबई (वृत्तसंस्था) : जगात दुर्मिळ असलेल्या बॉम्बे ब्लड ग्रुप या रक्त गटाचे दहा लाखात चार जण सापडतात. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण जवळच्या तीन गावात अवघ्या पाच हजाराच्या आसपास असलेल्या लोकवस्तीत या रक्त गटाचे चार जण सापडले आहेत. सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांनी ही माहिती दिली.
जागतिक दुर्मिळ रक्तगट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बॉम्बे ब्लड ग्रुपचे तब्बल ४ रुग्ण मालवण शहर आणि परिसरात मिळून आल्यान मालवणची श्रीमंती वाढली आहे.
काही आठवड्यापूर्वी रेवतळे इथला पंकज गावडे हा कोकणातला पहिला बॉम्बे ब्लड ग्रुपचा रक्तदाता मालवणात आढळून आला होता. त्यानंतर याच रक्तगटाचे आणखी तीनजण आढळून आले असून यामध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही जण एकाच नातेसंबंधातील आहेत.
सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठाने या तिघांचा शोध लावला आहे.