नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : योगामुळे भारताची प्रतिमा जगभरात उंचावली त्याप्रमाणेच देशातील अन्य सूक्ष्म शक्तीही भारताची प्रतिमा उंचावू शकतात असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
लखनऊ विद्यापीठाच्या शताब्दी समारोहात पंतप्रधान मोदी यांनी आज विद्यार्थ्यांना दूरदृश्यप्रणालीद्वारे संबोधीत केलं. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की; विद्यापीठं ही केवळ उच्च शिक्षणाची केंद्र नसून ती व्यक्तीमत्व विकास आणि प्रेरणेचे उर्जास्रोत आहेत.
बराच काळ आपण आपल्या शक्तींचा पूर्ण वापर केलाच नव्हता; शासकीय स्तरावरही हेच होत होतं. रायबरेली इथल्या रेल्वे कोच कारखान्याचं उदाहरण देत ते म्हणाले की या कारखान्याबाबत अनेक घोषणा केल्या गेल्या, प्रत्यक्षात मात्र २०१४ पर्यंत काहीच घडलं नव्हतं. २०१४ पासून या कारखान्याचा संपूर्ण क्षमतेनिशी वापर सुरू झाला. आणि रेल्वे डब्यांची निर्मिती सुरू झाली. लवकरच हे एक जागतिक केंद्र बनेल असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला.
विद्यापीठांनी आपापल्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्पादनांच संशोधन, ब्रँडिंग आणि मूल्यवर्धन केलं पाहिजे अशी अपेक्षा पंतप्रधानानी व्यक्त केली. यामुळे एक जिल्हा एक उत्पादन योजनेला मदत होईल तसच सरकारला धोरण निश्चित करण्यासही मदत होईल असं पंतप्रधान म्हणाले. विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त एका विशेष नाण्याच आणि विशेष टपाल तिकिटाचं अनावरण मोदी यांनी केली.