मुंबई (वृत्तसंस्था) : वेश्या व्यवसाय करुन उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना कोविड१९च्या प्रादुर्भावाच्या काळासाठी आर्थिक मदत द्यायचा शासन निर्णय राज्य सरकारनं काल जारी केला.
या निर्णयानुसार ओळख निश्चित केलेल्या वेश्या व्यवसायातल्या महिलांना दरमहा ५ हजार रुपये आणि ज्या महिलांची मुलं शाळेत जातात अशा महिलांना अतिरिक्त अडीच हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबर, २०२० या ३ महिन्यांच्या कालावधीसाठी ही मदत दिली जाईल. यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून ५१ कोटी १८ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
ही मदत देताना ओळखपत्राचा आग्रह धरला जाणार नाही असं राज्य सरकारनं स्पष्ट केले आहे.