मुंबई (वृत्तसंस्था) : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतल्या मातोश्री या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात रश्मी ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.