मुंबई (वृत्तसंस्था) : स्वयंसेवी संस्था, शासकीय यंत्रणेतले सर्व घटक यांनी त्यांच्या स्तरावर पुढाकार घेऊन नियमांचं पालन करुन रक्तदान शिबिरं आयोजित करावीत. थोर व्यक्तींच्या जयंती, पुण्यतिथी आणि इतर तत्सम कार्यक्रमाच्या दिवशी रक्तदान शिबीरं आयोजित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन अन्न आणि औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.

डॉ. शिंगणे यांनी मुंबई आणि ठाणे इथल्या रक्तपेढीच्या प्रतिनिधी यांची तातडीनं बैठक घेतली. बैठकीला मुंबई व ठाणे येथील 30 रक्तपेढ्यांचे प्रतिनिधी, अन्न व औषध प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी व राज्य रक्त संक्रमण परिषदेचे अधिकारी उपस्थित होते. लॉकडाऊनच्या कालावधीत मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री यांनी वेळोवेळी जनतेला रक्तदानासाठी आवाहन केल्यानंतर जनतेने त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.