मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड लसीवर केंद्र आणि राज्य सरकारचं नियंत्रण असेल, प्रत्येकाला लसीकरणाच्या टप्य्यानुसारच लस दिली जाईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.ते काल जालना इथं वार्ताहरांशी बोलत होते.
देशातल्या पाच कंपन्यांकडून कोविड लस निर्मितीसाठी काम सुरु असून, लस आल्यानंतर ती कशा पद्धतीनं द्यायची याबाबत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त होत आहेत. लस उपलब्ध झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात डॉक्टर,पोलीस आणि विविध आजार असलेल्या नागरिकांना देण्याचं नियोजन केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं ते म्हणाले.
वॅक्सिनेशन करण्यासाठीचं एक फार मोठं मॅनेजमेंट करणं अपेक्षित आहे.त्यासाठी केंद्र सरकारच्या काही मार्गदर्शक सूचना येत आहेत.आणि त्यामध्ये टारगेटेड पहिलं जे आहे ते डॉक्टरर्स आणि पोलीस विभाग त्याचबरोबर आम्हाला जे सांगितलं आहे.
ते पन्नास वर्षांचे वरचे को-मॉरबीड असलेली पॉप्यूलेशन आणि नंतर मग सिनीअर सिटीझन्स क्रमवारीनं हा सगळा डेटा तयार करण्याचं काम आमच्याकडून सध्या सुरु आहे