पिंपरी : आम्ही ‘PCMC Teen 20 स्कुलोत्सव अंतर्गत जागरूकता सेमीनार आयोजित करीत आहोत, जे भारत सरकारद्वारे उपक्रमीत आहे. मुलांमध्ये कला आणि खेळांच्या माध्यमातील जागरूकता निर्माण करण्यासाठी हा एक सेमिनार आहे. हा कार्यक्रम आपल्या शिक्षकांसाठी प्रथम आणि नंतर पालकांसाठी असेल. हा सेमिनार तुमच्या शाळेत ब्रेनेक्स मास्टर्स द्वारे आयोजित केला जाईल. या सेमिनार मध्ये विद्यार्थांना व पालकांना खेळ, कला, व गुण कौशल्य हे त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी कसे उपयुक्त ठरतात या विषयी माहिती दिली जाईल. वरील नमूद केलेल्या सेमिनार मध्ये शाळेची कोणतीही आर्थिक जबाबदारी राहणार नाही. कारण संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कला, क्रीडा आणि साहित्य विभागाचे सभापती श्री. तुषार हिंगे यांनी  केले आहे.

शक्य असल्यास आपल्या शाळेतील सर्व शिक्षक आणि पालकांसाठी हा सेमिनार अनिवार्य बनवा जेणेकरून ‘PCMC Teen20 स्कुलोत्सव चे महत्व संपूर्ण समाजात पोहोचेल. तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय व खाजगी शाळांमध्ये हा महत्तपुर्ण उपक्रम राबविणात येणार आहे.

(टिप- सेमिनारसाठी पालकांना आमंत्रित करण्यासंबंधी आव्हाने आल्यास आमचा कार्यसंघ मदत करून जास्तीत जास्त पालकांना उपस्थित कसे राहता येईल यासाठी प्रयत्न करेल, तसेच जर आपल्या शाळेला सेमिनार साठी जागेच्या उपलबद्धते संदर्भात काही समस्या आल्यास, पिंपरी चिंचवड महानगरपालिके मार्फत उपलबद्धता करण्यासाठी प्रयत्न केले जातील.)