मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांच्या वतीनं येत्या १२ आणि १३ डिसेंबरला राज्यस्तरीय महारोजगार मेळावा घेण्यात येणार आहे. यातून उमेदवारांना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होणार आहेत. उमेदवारांसाठी ७० हजार रिक्त पदं उपलब्ध आहेत.

राज्यातले उद्योग, व्यवसाय पूर्ववत कार्यरत होत आहेत, त्यामुळे रोजगाराच्या या संधी उपलब्ध झाल्या आहेत. नोकरीसाठी इच्छुक युवक युवतींनी https://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.